news today, वैजापूर शहरात महावीर जन्म कल्याणक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैजापूर ता.31 - शहरात श्री.भगवान महावीर जन्म कल्याणक दिन विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंगळवारी (ता.31) सकाळी शहरातून भव्य शोभायात्रा व मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

सकल जैन समाजातर्फे सकाळी आठ वाजता शहरातील जैन स्थानक परिसरातून ही शोभा मिरवणूक काढण्यात आली.
भगवान महावीर  "भगवान महावीरजी की जय","अहिंसो परम धर्म की जय",भगवान महावीर भगवान की जय अशा घोषणा देत  जैन समाजातील महिला व पुरुष आपल्या दुचाकीसह या शोभायात्रेत सहबागी झाले होते. 'रॅली' ला वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशशेठ बोथरा, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत,  बाबूलालजी संचेती यांनी ध्वज दाखविला.

भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभा पदयात्रा फेरी प.पू.श्री.तारक ऋषीजी व प.पू.श्री.तिर्थतीलक महाराज यांच्या उपस्थितीत मंगल वाद्यच्या स्वरात शहराच्या मुख्य रस्त्यावरून  काढण्यात येऊन भगवान महावीरजींचा अहिंसो परमो धर्म हा संदेश शहरात घराघरात पोहचविण्यात आला. या फेरीचा समापन समारंभ जैन स्थानक येथे ऋषीजी यांच्या अमृत वचनांनी झाला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम ही सम्पन्न झाले..राजेंद्र संचेती, विजय कासलीवाल, निलेश पारख, सुनंदीलाल बोथरा, पारख यांनी सहकार्य केले.
या शोभायात्रा मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती, नगरसेवक विशाल संचेती, प्रफुल संचेती, उमेश संचेती, सुरेंद्र संचेती, राजेंद्र संचेती, निलेश पारख, डॉ.अजित बोरा, सूनंदीलाल बोथरा, जीवनलाल पारख, सुभाष बोहरा, अनिल धरमचंद संचेती, महावीर सेठ बाफना, संतोष कासलीवाल, अशोक कोठारी, महेंद्र बेदमुथा, विजय दायमा, हेमंत संचेती,  मनोज छाजेड, विनोद छाजेड,  सुभाष शर्मा, सुनीता संचेती, सुनीता बेदमुथा, राखी बोहरा, नीता लोहाडे, अर्चना लोहाडे, गीतांजली लोहाडे, वनिता कासलीवाल, शीला शेट्टी यांच्यासह सकल जैन समाजातील महिला व पुरुष मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments