खरात राजकीय व्यक्तींसाठी “विशेष क्लास” घेत असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून, यापूर्वी अफवा मानल्या जाणाऱ्या चर्चांकडे आता वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. याचबरोबर प्रत्येकी सुमारे एक लाख रुपयांच्या अंगठ्यांची विक्री हा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. वैजापूरमधील काही लोकांनी या अंगठ्या घेतल्याच्या चर्चा असून, प्रकरण उघड झाल्यानंतर त्या लपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे. शहरात “अंगठी कोणी घेतली ?” हा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात असल्याचे चित्र आहे. याशिवाय काही महिलाही त्याच्या 'अनुयायी' होत्या. अशी चर्चा आहे. दरम्यान, वैजापूरमध्ये खरात यांचा एक “खास पंटर” सक्रिय होता, त्याच्या माध्यमातून अनेक प्रतिष्ठित लोक त्यांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. आशीर्वाद, क्लास आणि महागड्या वस्तूंपर्यंत पोहोच मिळवून दिल्याचा दावा स्थानिक पातळीवर केला जात आहे. त्यामुळे हे जाळे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित होते की त्यामागे आर्थिक अथवा राजकीय खेळ दडलेला होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वैजापूर कनेक्शन नेमके किती खोल आहे, राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी बाबाचा वापर झाला का आणि महागड्या अंगठ्यांच्या नावाखाली किती आर्थिक व्यवहार झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments