news today, भाजपतर्फे वैजापूर दक्षिण व उत्तर निवासी कार्यशाळा संपन्न

जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची प्रमुख उपस्थिती ...


वैजापूर, ता. 28 - छत्रपती संभाजीनगर पश्चिम जिल्ह्यातील वैजापूर दक्षिण व उत्तर मंडळांची निवासी कार्यशाळा शनिवारी (ता.28) वैजापूर शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष संजय भाऊ खंबायते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाली.

या कार्यशाळेस छञपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, तालुकाध्यक्ष बजरंग मगर, सुरेश राऊत, नारायण कवडे, पालिकेतील गटनेते दिनेश राजपूत, दामोदर पारीक, शैलेश पोंदे, गणेश खैरे, नगरसेविका ज्योतीताई जोशी यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


अध्यक्षीय समारोप प्रसंगी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांवर तसेच भारतीय जनता पक्षाच्या विचारधारा व कार्यपद्धतीवर सविस्तर संवाद साधण्यात आला. तसेच प्रसारमाध्यमे समाजमाध्यमे आणि प्रभावी संवाद यावर विशेष भर देण्यात आला.

Post a Comment

0 Comments