news today, टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवक ठार ; नागपूर - मुंबई रस्त्यावरील घटना

वैजापूर - भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने युवक ठार झाला.हा अपघात बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नागपूर मुंबई महामार्गावर भग्गाव चौफुलीवर घडला.

.             अपघातात मृत्यू पावलेला ऋषीकेश शेटे 

ऋषिकेश बाळासाहेब शेटे (18 वर्ष) रा. भग्गाव ता.वैजापूर असे या घटनेतील मयत युवकाचे नाव आहे. ऋषीकेश सकाळी घरून शेतात विद्युत पंप बंद करण्यासाठी दुचाकी (एम एच 20 एच. ए. 5148) वर जात होता.त्यावेळी भग्गाव चौफुलीजवळ रस्ता ओलांडत असताना कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने (एम 05 डी के 9760) दुचाकीला जोराची धडक दिली.यात ऋषिकेश याचा जागेवर मृत्यू झाला.  पोलीस पाटील अनिल धिवर यांनी नागरीकांच्या मदतीने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपजिल्हा रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.ऋषीकेश हा रोटेगाव येथील एम आय टी महाविद्यालयात इंजीनियरिंग चे शिक्षण घेत होता.तो आई वडिलांना एकुलता मुलगा होता.त्याच्या पश्चात आई,वडील, बहीण असा परिवार आहे.
फोटो सह

Post a Comment

0 Comments