वैजापूर शिवारात समृद्धी महामार्गावरील घटना...
वैजापूर, ता .02 - ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन खांबावर आदळल्याने अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.01) सकाळी दहा वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर वैजापूर शिवारात घडली.
समृद्धी महामार्गावरून माल घेऊन मुंबई येथून ट्रक (जी जे 03 बी वाय 8485) हा बंगलोर येथे जात होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने त्याचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन खांबावर आदळला..या अपघातात चालक व मदतनीस हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहीती मिळताच सुरक्षा पर्यवेक्षक कृष्णा बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
ट्रक चालक जयमल जुडास्मा (45 वर्ष) व मदतनीस अल्ताफ सुमरा (40 वर्ष) रा. गुजरात अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला. शिल्लेगाव पोलीस व समृद्धी महामार्गाचे सुरक्षा रक्षक यांनी मदत कार्य केले.
फौजदार चव्हाण, कृष्णा बडे, गजानन तायडे, शिवाजी बेळे, गरड,
यांनी मदत कार्य केले.
0 Comments