छञपती संभाजीनगर, ता.02 - राज्यातील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाच्या प्रशासन विभागाने गुरुवारी (ता.02) काढले असून छञपती संभाजीनगर जिल्हयातील तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
छञपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित व महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याजागी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांची यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी एम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत यांची बदली नवी मुंबई येथे संचालक जलजीवन मिशन या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार अमोल येडगे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाचे सह सचिव सुभाष उमरीकर यांनी हे बदली आदेश जारी केले असून या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या पदाचा कार्यभार सोपवून नव्या नियुक्त अधिकाऱ्यांनी त्वरित पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
0 Comments