छत्रपती संभाजीनगर, दि. 9 (जिमाका) - जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियाना अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्ये सर्व शासकीय विभागाने लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाने सर्वसामान्य नागरिकांना, महसूल , कृषी, आवास योजना सह विविध योजनांचा लाभ द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बैठकीत दिले.
सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक श्री. वीर, सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या सह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
सेवा पंधरवड्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे, शेतकऱ्यांना शेत रस्ता उपलब्ध करून देण्याबरोबरच याच्या नोंदी नकाशावर घेणे. शेतकऱ्यांच्या पिक विमा संदर्भात प्राथमिक अहवाल नोंदी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तसेच पोलीस विभागाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्या संदर्भाचे प्रस्ताव संदर्भाची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.जिल्ह्याला दिलेले वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच 17 सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या 70 हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रगीत आणि राज्य गीत समूहगीत गायन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या विकासासाठी शेतकरी, गोरगरीब ,बेघर आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबियांना मदत मिळवण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबरोबरच विविध सामाजिक संस्थेच्या अंतर्गत ही लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत व नाविन्यपूर्ण उपक्रमातून सेवा पंधरवडा उपक्रमाची अंमलबजावणी करून साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये सेवा पंधरवड्यात विविध योजनांच्या अंमलबजांविषयी ग्राम स्तरावर आढावा घेऊन संबंधित गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय अधिकाऱ्याने यांनी गांभीर्याने दखल घेऊन योजनाची अंमलबजावणी करावी .यासाठी विविध योजनांचे जनजागृती करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयाने पुढाकार घ्यावा. शेतकरी, संदर्भातला योजना, वृक्ष लागवड , विविध आवास योजना याबाबतही संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अंकित यांनी दिले.
सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने प्रस्ताविकामध्ये अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी महसूल विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते यांच्या नोंदी व गाव रस्त्याच्या नोंदी ,मामलेदार व हायकोर्ट या संदर्भात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणाचा आढावा संबंधित तहसील कार्यालयाच्या अंतर्गत घेण्यात यावा. यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांनी समन्वयाने काम करावे. शिवार फेरी आयोजित करून नोंदी घेण्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच भूमि अभिलेख कार्यालय अंतर्गत गाव निवड करून गावाच्या रस्त्याच्या नकाशाच्या नोंदी ज्या घेतल्या नाहीत त्या नवीन घेताना भूसंपादन झालेल्या रस्त्याच्या नोंदी देखील नकाशावर घेण्याबाबतचे सुचित करण्यात आले. महसूल विभागाने शेत रस्ता उपलब्धता, कुणबी प्रमाणपत्र आणि इतर महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी या पंधरवड्यात करण्याचे निर्देश दिले.
ग्रामीण भागामध्ये बेघरांना आवास योजना चा लाभ देताना प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण रमाई आवास योजना, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत तसेच शबरी आवास योजना, यशवंत आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय आवास योजना याबाबतच्या जागा खरेदी व उपलब्धता या संदर्भाची संयुक्त कार्यवाही महसूल आणि भूमी अभिलेख तसेच ग्रामविकास विभागाने नियमानुसार करून आवास योजनेत दिलेले जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करून गरजू बेघरांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले.
जिल्ह्याला दिलेले चाळीस लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, ग्रामविकास, नगर विकास, आरोग्य आणि शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन उर्वरित वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे यांनी केले. सेवा पंधरवडा अंतर्गत हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.
जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या पिक विमा ची अंतिम पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा अहवालाच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने वेळेत घेण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवकाने कार्यवाही पूर्ण करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत पिक विमा मिळेल तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत त्यांच्या वारसा लाभ मिळवून देण्यासाठी शेतीच्या फेरफार नोंदी प्रलंबित ठेवू नये व या कुटुंबांना लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
पोलीस विभागाअंतर्गत गावात ग्रामीण भागात असलेला वाद रस्त्यावरून होत असतो या शेत रस्त्यावर असलेल्या वादावरील लोक अदालत ती मध्ये गुन्हे निकाली काढण्यासाठी पोलीस विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त सुनावणी घेण्याची ही नियोजन करण्यात यावे जेणेकरून गावातील वाद संपून एकोपा राहण्यासाठी मदत होईल असे पोलीस विभागाअंतर्गत सूचित करण्यात आले.
0 Comments