मुंबई, ता.11 - शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मंगळवारी (ता.09) वितरित करण्यात आला.राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1892.61 कोटी रुपयांचा निधी थेट जमा झाला.
मंत्रालयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,मंत्रिमंडळातील सदस्य व मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित. होते.

सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत समावेश आहे त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना उत्पादन खर्च भागवता यावा आणि शेती टिकाऊ व्हावी यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे.असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
0 Comments