news today, वैजापूर न्यायालयात 'इलेक्ट्रॉनिक पुरावा' या विषयावर कार्यशाळा संपन्न

आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हे व सुरक्षा तज्ञ ॲड. नंदकुमार जिवडे यांचे मार्गदर्शन ...

वैजापूर, ता.18 - वैजापूर: तालुका विधी सेवा प्राधिकरण व वैजापूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "इलेक्ट्रॉनिक पुरावा" या विषयावर बुधवारी (ता.18) वैजापूर न्यायालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आतंरराष्ट्रीय सायबर गुन्हे आणि सुरक्षा तज्ञ ॲड. नंदकुमार जिवडे ( मुंबई उच्च न्यायालय ) यांनी मार्गदर्शन केले.

सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी.एस.पिसाळ हे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हे व सुरक्षा तज्ञ अँड नंदकुमार जिवडे यांचे स्वागत करताना सोबत ॲड.महेश कदम, ॲड.सोहेल पटेल...

या वेळी ॲड.जिवडे यांनी भारतीय साक्ष्य अधिनियम आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याचे महत्व याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या मोबाईल आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवावे असे आवाहन केले. याप्रसंगी मंचावर न्या. डी. एस. पिसाळ, न्या. एन. एस. काळे, न्या. श्रीमती एस. के. खान, न्या. श्रीमती एम. ए. बेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 या कार्यशाळेस वकील संघाचे अध्यक्ष ॲड महेश कदम, सचिव ॲड सोहेल पटेल, सायबर गुन्ह्यांचे गाढे अभ्यासक ॲड.सोपान पवार, ॲड.पी एम जगताप, ॲड.के बी कदम, ॲड.एस.एस. ठोळे, ॲड.आर.डी थोट, सरकारी अभियोक्ता जी.जे.मांझा, ॲड. एस.एम.जेजुरकर, ॲड.पी.आर.बत्तासे, ॲड.के.एस.गंडे, ॲड. एन.एस.जगताप, ॲड.आर.डी.शिरसाठ,ॲड.एन.आर.गायकवाड, ॲड. आकाश ठोळे, ॲड.डी.बी.बावचे, ॲड.डी.टी.डघळे, ॲड. सईद अली, ॲड.मजहर बेग, ॲड.कुणाल बागुल, ॲड.किरण त्रिभुवन, ॲड.सविता पाटणी आणि वकील संघाचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments