news today, स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी गरजेचे - उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वस्तीगृहात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात...

वैजापूर ता.18 - शालेय व महाविद्यालयीन जीवनातील स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व वैचारिक जीवनाला आदर्श आकार देऊन आदर्श विद्यार्थी घडवतात असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी  भागवत फुंदे यांनी गुरुवारी (ता.18) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाद्वारे आयोजित वसतिगृह च्या "नवचैतन्य वार्षिक स्नेहसंमेलन वर्ष 2025-2026 च्या उदघाटनप्रसंगी बोलतांना केले.

.   स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक      
    भागवत फुंदे ...

अध्यक्षस्थानी जिल्हा शाळा व्यवस्थापन अधिकारी आशा लाखाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाधिकारी तथा शासनाचा डॉ, बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळालेले धोंडीरामसिंह राजपूत, माजी पर्यवेक्षक एम.आर.
गणवीर व पालिका पर्यवेक्षक बी.बी.जाधव उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोप आशा लाखाडे यांनी केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब सोनवणे व कार्यालयीन अधीक्षक आप्पासाहेब होराशिळ यांचीही उपस्थिती होती.आरंभी सर्व महापुरुष यांच्या प्रतिमाना अभिवादन करण्यात आले. प्रास्तविक अजित आर.भागवत यांनी केले. सूत्र संचलन ए.आर.माळी व ज्योती गौर यांनी केले. श्रीमती गवळी यांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थीनीनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गीते तसेच लष्करी व सामाजिक गीते सादर करीत नृत्य सादर केले.याच कार्यक्रमात सध्या सैनिक म्हणून कार्यरत असलेले या विद्यालयाचे माजी विद्यार्थी ऋषीकेस पगारे यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments