news today देवगिरी बँकेच्यावतीने वैजापूरात समाजकार्य करणाऱ्यांचा गौरव

देवगिरी–वैजापूर तालुका भूषण पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान 

भारतीय संस्कृती ही जगातील महान संस्कृती असून आपल्या रुढी-परंपरा या विज्ञानाशी जोडलेल्या आहेत. भारतातील कुटुंबसंस्था जगासाठी आदर्श असून तिचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे प्रांत कार्यवाह धनंजय धामणे यांनी केले.  देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने वैजापूर शहरातील पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात आयोजित देवगिरी–वैजापूर तालुका भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
वैजापूर तालुक्यातील झुंबरलालजी शर्मा, गोकुळ सुरासे, शिवनाथ रहाणे आणि डॉ. बबनराव साळे यांचा समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल बँकेच्या वतीने देवगिरी–वैजापूर तालुका भूषण पुरस्काराने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी वैजापूर पालिकेचे अध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर चालणाऱ्या देवगिरी बँकेच्यावतीने वैजापूर तालुक्यातील नागरिकांचा होत असलेला सन्मान ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. देवगिरी बँकेचे अध्यक्ष व जलदूत किशोर शितोळे यांनी बँकेच्या सामाजिक, वैचारिक आणि समाजाभिमुख उपक्रमांची माहिती देत संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालिका सौ. अमिता लेकुरवाळे यांनी केले. सूत्रसंचालन देवगिरी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर यांनी आभार मानले.

या प्रसंगी रा.स्व.संघाचे तालुका संघचालक अरुण जगताप, वैजापूरचे प्रतिष्ठित व्यापारी काशिनाथशेठ गायकवाड, देवगिरी बँकेचे संचालक राजेश सावळकर, नागनाथ काजळे, प्रज्ञाताई तल्हार,  मंगलताई वाहेगावकर, सुरेश जगाडे, सरदारसिंग बैनाडे, वैजापूर शाखेचे शाखाधिकारी समाधान घुगे व कर्मचारी यांच्यासह वैजापूर शहरातील मान्यवर तसेच नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments