वैजापूर ता.10 - पृथ्वीचे वाढते तापमान, पर्यावरणाचा ढासळत असलेला समतोल व पावसाचे कमी होत असलेले प्रमाण या सर्व बाबींवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून शासनाचे लक्ष वर्ष 2047 पर्यत हरित महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांनीच सर्वंकष प्रयत्न करून जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संरक्षण, संगोपन व संवर्धन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी शुक्रवारी (ता.10) वैजापूर येथे केले.
नगरपालिकेच्या आरक्षण क्र,114 येथे हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्षारोपण करून "हरित महाराष्ट्र अभियानाचा आरंभ त्यांच्याहस्ते झाला. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थी व एन. सी.सी.छात्र तसेच शहरातील नागरिकांनी आपल्या घरासमोर किंवा जागा असेल तेथे वृक्षारोपण करून त्यांचे संरक्षण,संवर्धन, संगोपन करण्याचे आवाहनही विनय गौडा यांनी केले.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी होते. त्यांनीही सर्व नगरसेवक व कर्मचारी वृक्षारोपण करतील असे आश्वासन यावेळी दिले. उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत यांची उपस्थिती होती. प्रास्तविकात मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत यांनी विशद केले की, या एक एकर जागेवर 16 हजार झाडे लावण्याचे उद्धिष्ट आहे. तसेच यापूर्वी शहरात विविध ठिकाणी 60 हजार वृक्ष लागवड केल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन नगरपालिका स्वच्छतादूत व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. याप्रसंगी पालिकेचे उपाध्यक्ष शेख रियाज, नगरसेवक राजुसिंह राजपुत, संजय बोरनारे, उल्हास ठोंबरे, विशाल संचेती,दशरथ बनकर, ताहेर खान (सुलतान) राजेश गायकवाड, प्रशांत कंगले, प्रकाश चव्हाण, राजेश गायकवाड ,हमीद कुरेशी, पारस घाटे, सावन चौधरी, शैलेश चव्हाण, लिमेश वाणी, मेजर शिवनाथ राहणे नगरसेविका ज्योती जोशी, संगीता राजपूत, सुमैय्या बक्ष, पूजा त्रिभुवन, लता वाणी, कविता शिंदे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments