news today, विधान परिषदेतील नऊ सदस्यांना निरोप

मुंबई, ता.25 - विधान परिषदेतील नऊ सदस्यांचा निरोप समारंभ आज पार पडला. या समारंभाला शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते.

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या नऊ सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि संजय केनकर यांचा समावेश होता. या निरोप समारभानंतर प्रथेप्रमाणे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निवृत्त सदस्यांसोबत फोटोसेशन पार पडले. 

यावेळी विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे आणि विधान परिषदेतील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments