news today, नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सोडले ; 15 दिवस आवर्तन सुरू राहणार


नांदूर मधमेश्वर कालव्याला 300 क्युसेसने पाणी सोडण्यात आले.

वैजापूर, ता. 21 -  वैजापुर व गंगापुर तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी नांदुर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यातून सोमवारी सायंकाळी चार वाजता उन्हाळी आवर्तनसाठी 300 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग टप्प्या टप्प्याने वाढवून आठशे क्युसेक करणार असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. हे पाणी मंगळवारी (ता.21) गंगापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होणार असून पायथा ते माथा या नियमानुसार आधी गंगापूर तालुक्यातील गावांना पाण्याचे वितरिकेद्वारे वाटप करण्यात येईल अशी माहिती नामका विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.

वैजापुर व गंगापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी  उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.पांढरा दिवस हे आवर्तन सुरू  राहणार आहे. यामुळे  परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी  पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कालव्यात मुबलक प्रमाणात पाणी साठा असून मे महिन्यात देखील एक पाणी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे कालवा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments