डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी...
वैजापूर ता.14- भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता.14) वैजापूर शहर व तालुक्यात विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरा करण्यात आली.
सकाळी नऊ वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, दलीत मित्र डॉ.व्ही.जी.शिंदे, तहसीलदार सुनील सावंत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, पंकज ठोंबरे, नगरसेवक विशाल संचेती, दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, डॉ .संतोष गंगवाल, बाबासाहेब गायकवाड, आबा जेजूरकर, रियाज पठाण, माजी नगरसेविका सुप्रिया व्यवहारे, सुनीता साखरे, सोनू राजपूत, श्रीमती धिवरे, श्रीमती कसबे, विलास म्हस्के, विशाल त्रिभुवन, सुनील त्रिभुवन,सागर अस्वले यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात विविध कार्यक्रमाने जयंती साजरी...
शहरातील आबेडकरनगर, रमाई चौक, जेतवन बुद्ध विहार येथेही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. उपस्थितीतांना खीर वाटप करण्यात आली, श्री.भुईंगळ यांनी व्याख्यान दिले. याच ठिकाणी रस्क्तदान ही घेण्यात आले. तसेच जीवनगंगा परिसरात ही डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन, महाप्रसाद वाटप करण्यात आले..शहरात पेन, वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. एस.एस.एस, जिम क्लब व मित्र परिवार यांनी भीम गीत कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला भव्य व आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रीमती कसबे, श्रीमती धिवरे व सहकारी महिला यांनी भीम गीते व वंदना सादर केली. तर धोंडीरामसिंह राजपूत यांनी उद्धेशिका वाचन केले. सायंकाळी जयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
0 Comments