वैजापूर, ता.22 - वैजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारीं रात्री दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास स्टीलच्या अवजड रोल वाहतूक करणारा ट्रकचा अपघात होऊन ट्रक पलटी झाला. या अपघातानंतर वाहनातील अवजड रोल रस्त्यावर पडले. या घटनेत ट्रक चालक व क्लिनर हे जखमी झाले. सुदैवाने पुतळा वाचला असून या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही..या अपघातात ट्रक चालक रफिक खा (वय 32 वर्षे) व क्लिनर लडूराम (वय 17 वर्षे) रा .जोधपूर, राजस्थान हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास भरधाव ट्रक (क्रमांक RJ 19 ch 4535) ही ट्रक गंगापूरच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्रक पलटी झाली.अपघातानंतर मोठा आवाज झाला. ट्रकमधील अवजंड रोल हे रस्त्यावर पडले, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपघाताचे वृत्त समजताच नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपनगराध्यक्ष शेख रियाज, नगरसेवक दिनेश राजपुत, राजेश गायकवाड, सुलतान खान,पत्रकार सुनील त्रिभुवन, आर पी आय चे बाळासाहेब त्रिभुवन, जुबेर चाऊस, अकील कुरेशी, आवेज खान, मयूर राजपूत व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान दोन क्रेनच्या साहाय्याने तातडीने अवजड रोल व वाहन हलवण्यात आले.
वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख,पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे, शेख,अविनाश भास्कर,योगेश झाल्टे,प्रशांत गीते,अमोल कांबळे,अजित नाचण,प्रल्हाद जटाळे, अभिजीत डहाळे, गणेश पठारे यांनी वाहतूक सुरळीत केली व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments