वैजापूर, ता.21 - जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष डॉ. दिनेश भाऊ परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर तालुक्यातील पाणी टंचाई, रोजगार हमी योजना तसेच विविध प्रशासकीय अडचणी संदर्भातील महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंगळवारी (ता.21) येथे पार पडली.
पंचायत समितीच्या स्व.विनायकराव पाटील सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष. जितेंद्र जैस्वाल, बांधकाम व अर्थ सभापती सचीन गरड, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कल्याण दांगोडे, पंचायत समिती सभापती वंदना शिंदे तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण विकासकामांना गती देणे, प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावणे व जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मुद्यांवर बैठीकीत चर्चा होऊन पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडत प्रशासनाशी थेट संवाद साधला. प्रलंबित कामांवर जबाबदारी निश्चित करून जलद निर्णय घेण्यावर विशेष भर देण्यात आला.
0 Comments