वैजापूर, ता .22 - विवीध प्रलंबित मागण्यासाठी महसूल कर्मचारी यांनी मंगळवार (ता.21) पासून संप पुकारला आहे.
या संपामुळे नागरीकांची कामे खोळंबली.
वैजापूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील 94 कर्मचारी संपात सहभागी झाले.तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील 5 कर्मचारी संपावर गेले. विशेषत ग्राम महसूल अधिकारी संपावर गेल्याने कामकाज ठप्प झाले आहे.
नागरीकांना सातबारा,आठ चा उतारा तसेच अन्य कागदपत्रे मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कार्यान्वित करावी.रिक्त पदे भरण्यात यावी.सेवानिवृत्तीचे वय 60 करावे .आदी मागण्या महसूल कर्मचारी संघटनेच्या आहेत.
0 Comments