वैजापूर ता.21 – शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे लोकनेते माजी आमदार स्व.आर.एम.वाणी साहेब यांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी नगरपरिषद हद्दीत त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक स्वप्नील जेजुरकर यांनी नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक जेजुरकर यांनी नमूद केले आहे की, स्व.आर.एम. वाणी यांनी आपल्या कार्यकाळात शहर व तालुक्यातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे व सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे ते आजही जनतेच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत.
भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी नगरपरिषद हद्दीतील योग्य ठिकाणी पुतळा उभारण्यात यावा व त्यासाठी निधीची तरतूद करून लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन नगरपरिषदेने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जेजुरकर यांनी यावेळी व्यक्त केली.
-
0 Comments