राज्य सरकारने गुरुवारी प्रशासनात फेरबदल करताना काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. छञपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत यांची काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत जल जीवन मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली होती. मात्र त्यांना नवी मुंबईतील बदली पसंद पडली नाही. मराठवाड्यातील राजकीय मंडळींनी विशेषतः सत्ताधारी पक्षातीलच काहींनी श्रीकांत यांना पुन्हा मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
जी. श्रीकांत यांनी लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर छञपती संभाजीनगरमध्ये वस्तू सेवाकर सहआयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांची महानगरपालिका आयुक्त म्हणून काम केले आता त्यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त असताना त्यांच्या बाजूने सत्तेतील दोन मंत्री उभे ठाकल्याचे चित्र दिसून येत होते तर आमदार प्रशांत बंब यांनी त्याच्या विरोधात विधीमंडळात तक्रारी केल्या होत्या. आता पुन्हा एकदा जी. श्रीकांत छञपती संभाजीनगरला परत आले आहेत. विभागीय आयुक्त म्हणून ते काम पाहणार आहे.
0 Comments