1 हजार 80 लाभार्थ्यांनी घेतला लाभ ...
महालगाव ता.17 - : महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र.1अंतर्गत शुक्रवारी (ता.17) महालगांव (ता.वैजापूर) येथे आयोजित विशेष महाराजस्व अभियान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराजस्व अभियान समाधान शिबिरात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, व्यासपीठावर आ. रमेश पाटील बोरनारे, तहसीलदार सुनील सावंत व अन्य ..
सकाळी दहा वाजता मारुती मंदिर सभामंडपात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन आमदार रमेश पाटील बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, तहसीलदार सुनील सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
छञपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे उदघाटन करतांना आ. रमेश पाटील बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, तहसीलदार सुनील सावंत
या शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित प्रकरणे, दाखले, जमीन नोंदी, वारसा नोंद, फेरफार, सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसह विविध अडचणी ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यात आले. अनेक प्रकरणांवर जागेवरच निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या शिबिराचा महालगाव मंडळातील भगुर, गाढेपिंपळगाव, पानवी बु.वक्ती, माळी घोगरगाव, एकोडी सागज, जातेगाव टेंभी, कौटगाव, माळी सागज, बल्लाळी सागज या गावांतील एकूण 1 हजार 80 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमास पंचायत समितीचे अजी सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे, डॉ.प्रकाश शेळके, बाजार समितीचे माजी सभापती रामहरी जाधव, पंचायत समिती सदस्या सौ.शितल राहुल आल्हाट, देविदास सामसे, सरपंच सौ. रोहिणी नानासाहेब काळे, उपसरपंच सौ. रुपाली संपत जाधव, मंगेश गायकवाड, नायब तहसीलदार सुरज कुमावत, प्रविण काकडे, मंडळ अधिकारी दीपक कराळे, आरोग्य अधिकारी इंदुरकर, कृषी अधिकारी व्ही. एस ठक्के, ग्राम पंचायत अधिकारी विजय वांढेकर, अब्दुल शेख तसेच महालगाव महसूल मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरामुळे नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यास मदत झाली असून प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
0 Comments