अमरावती, ता.03 - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात 'संघटन सृजन अभियान' राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून आज अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीकरिता AICC निरीक्षक म्हणून श्री. आफताबजी अहेमद (हरियाणा), निरीक्षक श्री. धीरजजी देशमुख, निरीक्षक डॉ. झीशान हुसेन, निरीक्षक श्री. रामविजयजी बुरुंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभियानाच्या अनुषंगाने अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे (AICC) विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये हरियाणाचे श्री. आफताबजी अहेमद, डॉ. झीशान हुसेन आणि श्री. रामविजयजी बुरुंगळे, श्री. धीरजजी देशमुख यांचा समावेश आहे.
आज शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता स्थानिक काँग्रेस भवन येथे निरीक्षक श्री. आफताब अहेमद, डॉ. झिशान हुसेन, श्री. रामविजयजी बरुंगळे, आणि आमदार भाई जगताप यांनी अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस खा. बळवंत वानखडे माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनीलभाऊ देशमुख, माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप, भैयादादा जगताप, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, विरोधी पक्षनेता विलासभाऊ इंगोले महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे , किशोरभाऊ बोरकर, बबलूभाऊ देशमुख, मिलिंद चिमोटे, तसेच सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने संघटन मजबुतीकरण, तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय आणि पक्षाच्या आगामी धोरणांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेची बांधणी अधिक बळकट करण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले आणि या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून अमरावतीत काँग्रेसचे संघटन अधिक प्रभावी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
0 Comments