news today, वैजापूर येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्यात यावे - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांची मागणी


वैजापूर ता.01/प्रतिनिधी -. वैजापूर येथे  मागासवर्गीय विद्यार्थीसाठी नविन वसतिगृह बांधण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वैजापूर येथे येत असतात. आर्थिक परिस्थिमुळे राहण्याची सोय होत नसल्यामुळे त्यांना शिक्षण सोडून गावाकडे जावे लागते. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैजापूर येथे शिक्षण घेण्याची व राहण्याची सोय व्हावी म्हणून बऱ्याच दिवसापासून मागणी होती
       वैजापूर येथे मागासवर्गीय विद्यार्थीची रहाण्याची सोय व्हावी म्हणून 100 मुलींना व 200 मुलांना राहण्यासाठी नविन वस्तीगृहाची इमारत बांधण्यात यावी  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळात माजी सभापती एल. एम. पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, युवक विधानसभा अध्यक्ष नितीन तांबे, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष दिनेश त्रिभुवन आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments