news today, शाळेच्या बसची स्कूटीला धडक ; शिक्षकाचा मृत्यू

.    शाळा बसच्या धडकेत मृत्यू पावलेले शिक्षक सुलताने

वैजापूर, ता.07 - वैजापूर शहरातील श्रीराम कॉलनीतील शिक्षक भगवान सुलताने यांचे शनिवारी सकाळी अपघाती निधन झाले. सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास स्कुटीवरून दूध घेऊन परतत असताना गंगापूर रस्त्यावरील साईनाथ कॉलनीच्या वळणाजवळ शाळेच्या बसने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते सावखेडगंगा (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments