राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.. आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार
वैजापूर, ता.06 - वैजापूर तालुक्यातील पाराळा गावचे सुपुत्र आणि विद्यार्थीदशेपासूनच अभ्यासू व धडपडू म्हणून ओळखले जाणारे डॉ. कैलास आहेर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) या अत्यंत प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे. या यशाबद्दल पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी विशेष सत्कार करून डॉ. कैलास आहेर यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी प्रा. लक्ष्मणराव धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच विशाल शेळके उपस्थित होते.
राज्यातील कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत गावातून राज्यस्तरापर्यंत झेप घेतलेल्या या यशामुळे पाराळा गावात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण आहे. डॉ. कैलास आहेर यांच्या मेहनतीला, चिकाटीला आणि शैक्षणिक समर्पणाला तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्या भावी सेवाकार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत
0 Comments