वैजापूर ता,०6 - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिन निमित्त शहरातील सर्व थरातील नागरिकांनी शनिवारी (ता,०6) डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महिलांनी वंदना गायिली तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय घोष करीत सर्वांनी जयजयकार केला.
अभिवादन समयी माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक डॉ.दिनेश परदेशी, दशरथ बनकर, दामोदर पारीख, राजेश गायकवाड, सुनील त्रिभुवन, विलास म्हस्के,आबासाहेब कसबे, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, प्रमोद पठारे, प्रशांत त्रिभुवन, जयप्रकाश बोरगे, अशोक तांबूस आप्पा, डॉ,बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर अशोक बागुल, डॉ, संतोष गंगवाल, धोंडीरामसिंह राजपूत तसेच जगन गायकवाड, ॲड. साळवे, ताराचंद त्रिभुवन, साहेबराव पडवळ, चांगदेव उघडे यांनी प्रथम पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. श्रीमती रेखा गायकवाड, निर्मला जाधव, श्रीमती धिवरे, श्रीमती निकाळे, श्रीमती कोसे, श्रीमती त्रिभुवन यांनी वंदना सादर केली.
या निमित्त जेतवन बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात आले होते. आरंभी धोंडीराम राजपूत यांनी प्रास्ताविकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली. संचलन सुनील त्रिभुवन यांनी केले. आभार आयोजक राजेश गायकवाड यांनी मानले. या प्रसंगी सुनील पवार, विनोद गायकवाड, ज्ञानेश्वर सिरसाट, श्री.दिवे, श्री,चव्हाण, रवी बनकर, श्रीकांत साळुंके शहरातील सर्व थरातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments