पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी भागा चुरशीची लढत पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदावरून महायुतीत मतभेद निर्माण होऊन 'ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष' अशी भूमिका घेत शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी आपले धाकटे बंधू संजय बोरणारे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत आली. भाजप उमेदवार डॉ.दिनेश परदेशी व संजय बोरणारे यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. तर प्रत्येक प्रभागात नगरसेवकपदाच्या लढतीतही चुरस पाहायला मिळाली.
मतदान संपल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात कोण जिंकणार याची चर्चा सुरू झाली असून कोणाला किती मते पडली असतील याची आकडेमोड करून अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी कोण कुणाला भारी पडला आणि कोणत्या प्रभागातून कोण निवडून येणार व नगराध्यक्ष कोण होणार ? अशा चर्चा सध्या शहरात रंगत असून मतमोजणी पुढे गेल्याने ही उत्सुकता आणखी वाढली आहे
0 Comments