वैजापूर, ता.04 - श्री.दत्तजयंती निमित्त शहरातील विविध ठिकाणी गुरुवारी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
श्री दत्त जन्मोत्सव आनंद व उत्साहात पार पडला. झाला.
येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात (केंद्रात) दुपारी 12.39 वाजता श्री दत्तजन्म उत्सव गुरूचरित्र पारायणच्या चौथ्या अध्यायांचे सामूहिक वाचन करून दत्तजन्म उत्सव सम्पन्न झाला. नंतर उपस्थिताना प्रसाद वाटप करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक लिमेश वाणी, घनश्याम वाणी, धोंडीरामसिंह राजपूत, बापू गावाडे उपस्थित होते. या केंद्रात सुरेश आलूले यांनी सपत्निक आरती व पूजा केली.
वैजापूर येथील श्री दत्तगिरी आश्रमात श्री दत्त प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली.
येवला रस्त्यावरील श्री दत्तगिरी आश्रमात श्री दत्त प्रतिमा रथात ठेऊन मिरवणुक काढण्यात आली व आश्रमात भांगशीमाता गड येथील श्री श्री १००८ महामंडलेश्वर महंत परमानंदगिरी महाराज यांचे प्रवचन होऊन श्रीदत्त जन्मोत्सव साजरा झाला व उपस्थित भक्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, डॉ.दिनेश परदेशी, संजय बोरनारे, बाबासाहेब जगताप, राजेंद्र साळुंके, विशाल संचेती, श्रीकांत साळुंके, बापू वाणी, भाऊलाल सोमासे, बाबुराव वाणी, प्रशांत शिंदे यांची उपस्थिती होती.
दत्तगिरी आश्रमाचे सेवेकरी यांनी सहकार्य केले व आलेल्या संत महंतांचे पूजन केले. देशपांडे गल्ली येथील दत्त मंदिर,वैजीनाथ महादेव मंदिर येथील दत्तमंदिर,शास्त्रीनगर येथील दत्तमंदिर,दत्तनगर येथिल मंदिरातही श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात व विविध कार्यक्रमानी पार पडला
0 Comments