news today, सशक्त भारताची वाट संविधानातूनच - दंगलकार नितीन चंदनशिवे

वैजापूर, ता .04  सर्वधर्मसमभावाची पेरणी करून माणुसकी जोपासण्याची भूमिका भारतीय संविधानाने दिली असून सशक्त व समृद्ध भारत घडवण्यामागे संविधानाचीच मूलभूत प्रेरणा आहे, असे प्रतिपादन विद्रोही कवी नितीन चंदनशिवे (दंगलकार) यांनी केले. भारतीय संविधानाच्या गौरव दिनानिमित्त वैजापूर शहरातील जीवनगंगा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते सशक्त व समृद्ध भारत : भारतीय संविधानाची मार्गदर्शक भूमिका  या विषयावर बोलत होते. 
    
.वैजापूर येथे आयोजित कार्यक्रमात विद्रोही कवी नितीन    चंदनशिवे यांचे जीवनगंगा सार्वजनिक वाचनालयतर्फे स्वागत करण्यात आले...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्नड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनिष दिवेकर होते. मंचावर डॉ. दादासाहेब साळुंके, ॲड. आकाश ठोळे, शाहिर अशोक बागुल, गीतकार विजय मोकळे,  जयप्रकाश बोरगे यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीचे पुजन केले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे आर्वी नरवडे हिने वाचन केले. त्यानंतर मालेगाव घटनेतील तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्येप्रकरणी पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
     
चंदनशिवे यांनी जातधर्माच्या राजकारणावर तीव्र टीका करत सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीवर विविध मार्गांनी होत असलेल्या आघातांवर प्रकाश टाकला. तसेच समाजाला विचार करायला लावणाऱ्या विद्रोही कविता त्यांनी प्रभावीपणे सादर केल्या. प्रास्ताविक डॉ. आबासाहेब कसबे यांनी केले. सुत्रसंचलन प्रमोद पठारे यांनी तर आभारप्रदर्शन सागर सोनवणे यांनी केले.
   याप्रसंगी जीवनगंगा सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा अलका बागुल, सचिव कविता कसबे, शीतल नरवडे, छाया जाधव, सपना सोनवणे, सुलक्षणा जोगदंड, साहेबराव पडवळ, संजय पगारे, सुरेश बागुल उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments