वैजापूर, ता.04 - तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने द्वितीय गळीत हंगामातील 1 ते 15 नोव्हेंबरदरम्यान गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक डिसेंबरला जमा केल्याची माहिती चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी दिली. पंधरा दिवसांत देय देण्याची परंपरा कायम ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी प्रथम हीच आमची भूमिका असून ऊसबिलाच्या वेळेवर देयकासाठी पंचगंगा व्यवस्थापन पूर्णपणे कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे बिल वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने जमा होण्यासाठी सर्व खातेप्रमुख तसेच वित्त विभाग पूर्णपणे सज्ज आहे. ही परंपरा येणाऱ्या काळातही कायम ठेवणार आहोत, तसेच पंचगंगा कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर देयक, पारदर्शक वजन काटा आणि विश्वसनीय सेवा देण्याची बांधिलकी कायम आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
पंचगंगा साखर कारखान्याच्या या तातडीच्या देयकामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी व इतर आर्थिक गरजांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्याने चालू हंगामात जाहीर केलेल्या धोरणानुसार ऊसबिल १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची परंपरा यंदाही अबाधित ठेवली असून त्यामुळे परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे.
0 Comments