news today, नगराध्यक्ष आमचाच होणार ; भाजप - शिवसेना कार्यकर्त्यांचा दावा

21 तारखेच्या प्रतिक्षेत 'आकडेमोड' सुरू ... 

वैजापूर, ता.07 - नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होऊन आज सहा दिवस झाले आहेत. मतमोजणी 21 तारखेपर्यंत लांबल्याने आता फक्त आणि फक्त चर्चा सुरू आहे की, कोण निवडून येणार, कोणत्या भागात कोण चालला, कुणी किती पैसे वाटले, मतदारांनी कसे कसे पैसे घेतले आणि पुढे काय होणार याची आकडेमोड सुरू आहे.

.          डॉ. दिनेश परदेशी.                  संजय बोरनारे 

दररोज समोरासमोर एकमेकांची भेट झाली की ,प्रत्येक जण एकमेकाला विचारतोय तुमचा काय अंदाज आहे ? आणि मग हा सांगतो नाही, राव काही सांगता येत नाही, प्रत्येक प्रभागात वेगळा अंदाज येतोय .कुणी म्हणतोय आमच्या भागात कमळ चाललाय, कुणी म्हणतो धनुष्य बाण ची हवा आहे. तर कुणी म्हणताय पंजा ही चांगला चाललाय. पण खरी लढत लढत कमळ आणि धनुष्यबाणमध्येच आहे असे म्हणणारे सुद्धा खूप आहेत. त्यामुळे समोरचा ऐकणारा देखील गांगरून जात आहे. एक व्यापारी म्हणतो धनुष्यबाण ची हवा आहे तर दुसरा म्हणतो नाही गाव शांत ठेवायचा असेल तर धनुष्यबाण शिवाय पर्याय नाही. त्यामुळे  नगराध्यक्षपदी नेमकं कोण निवडून येणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

आकडेमोड करणाऱ्या काही बहाद्दरांनी मात्र, आपल्या गणिती क्रियेने भाजपचे कमळ निवडून येणार असे भाकीत मांडले  तर  दुसरीकडे धनुष्यबाण निवडून येणार यावर अनेक जण ठाम आहेत. शिवसेना आमदार बोरणारे यांनी मोठ्याप्रमाणात विकास कामासाठी निधी मंजूर करून आणला असून शहरात जवळपास 250 कोटींची कामे झाली आहेत त्यामुळे धनुष्यबाणचे पारडे जड आहे. असाही युक्तिवाद केला जात आहे. तर भाजपचे डॉ .दिनेश परदेशी यांचा शहरात चांगला जनसंपर्क संपर्क असून तेच बाजी मारणार असंही म्हटलं जातं आहे.

एकूणच 21 तारखेपर्यंत दररोज नवेनवे अंदाज व्यक्त होणार आहेत. चौका चौकात गणित बदलत आहे, मतदार मात्र शांत आहे. त्याने कोणाला मतदान केले हे तो नेमके खरं सांगत नाहीये. समोरच्या व्यक्तीचा कल पाहून त्याच पक्षाच्या बाजूने मतदार आपले मत व्यक्त करीत आहेत.मात्र, स्वतःचे मतदान त्याने कोणाला केले याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही.

Post a Comment

0 Comments