वैजापूर, ता .09 - खासगी बस व टेम्पोच्या धडकेत चार जण जखमी झाले. सोमवारी (ता.08) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वैजापूर खंडाळा रस्त्यावर रोटेगाव उड्डाण पुलावर हा अपघात घडला. या अपघातात बस चालकासह मोटारसायकलवर प्रवास करणारे तीन जण जखमी झाले. चालक संदीप सोमनाथ निरगुडे (58 वर्ष) रा पांगरी, ता सिन्नर हा गंभीर जखमी झाला. तसेच पल्लवी सुरेश गोरे (25 वर्ष) व किरण गोरख निकम (26वर्ष) रा जरुळ,साजेद गुलाब पठाण (34 वर्ष) रा खंडाळा हे मोटारसायकल वरून प्रवास करणारे जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगर येथे प्रवासी सोडून खासगी बस (एम एच 17 सी व्ही 5555) वैजापूर कडे येत होती.त्यावेळी वैजापूर येथून शिवूर कडे जाणारा टेम्पो (एम एच 41 जी 9005) व बसची समोरा समोर धडक झाली. या धडकेत बस चालक गंभीर जखमी झाला.तसेच टेम्पो चालक पळून गेला.यावेळी दोन मोटारसायकल अपघात ग्रस्त वाहनांवर धडकल्या. यात मोटारसायकल वरील पल्लवी व किरण तसेच साजेद पठाण हे तिघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे व त्यांचे सहकारी तसेच आघूर येथील केतन आव्हाळे यांनी मदत कार्य केले.किरण व पल्लवी यांचेवर उपजिल्हा रुग्णालयात व साजेद तसेच चालक याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments