news today, अंगणवाडी सेविकांना त्रास देणाऱ्या लाडगांव बीटच्या पर्यवेक्षिका साळवे यांच्या बदलीची मागणी

बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन...

वैजापूर, ता. 16 - अंगणवाडी सेविकांना विनाकारण त्रास देऊन मानसिक छळ करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लाडगांव बीट मधील पर्यवेक्षिका शोभा साळवे यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी या बीट मधील अंगणवाडी सेविकांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देताना अंगणवाडी सेविका ...

या संदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,  लाडगांव बीटमध्ये कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका शोभा साळवे या अंगणवाडी सेविकांना अपमानास्पद वागणूक देतात. अरेरावीची भाषा वापरून लज्जास्पद बोलतात. विनाकारण त्रास देणे, रजा न स्वीकारणे आदी प्रकारामुळे अंगणवाडी सेविकांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तरी अंगणवाडी पर्यवेक्षिका शोभा साळवे यांची दोन दिवसात बदली करण्यात यावी.

प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर अश्विनी सोनवणे, भाग्यश्री पवार, अनिता साळवे, सारिका वाघ, दुर्गा कदम, सीमा दाभाडे, रुपाली चौधरी, पूजा निर्मळ, शोभा गुंड, सपना राजपूत, शोभा मते, पुष्पा लहिरे, आशा भोसले, ललिता कांबळे, शोभा शिंगरुळे, अश्विनी रक्ताटे, अर्चना गाढे, वंदना जाधव, पुष्पा जाधव, जया गाढे, निकिता ठोंबरे, भारती गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments