वैजापूर, ता. 17 - कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी
उपसभापती विष्णूभाऊ भीमराव जेजुरकर (वय 75) यांचे शुक्रवारी (ता.16) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू असा परिवार आहे. ते नगर परिषदेचे नगरसेवक स्वप्निल जेजुरकर व सेतू सुविधा केंद्राचे कुमोद जेजुरकर यांचे वडील होत.
आमदार रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, नगरसेवक दशरथ बनकर, मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, प्रशांत सदाफळ, पत्रकार जफर खान, सचिन वाणी, देविदास वाणी, काशिनाथ गायकवाड, घन:शाम वाणी, धोंडीराम राजपूत यांनी आदरांजली वाहिली.
0 Comments