news today, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ; वैजापूर तालुक्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल

वैजापूर, ता.19 - पाच फेब्रुवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चौथ्या दिवस अखेर (सोमवार) वैजापूर तालुक्यात 107 जणांनी 153 अर्ज नेले. यात जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी 48 जणांनी 67 अर्ज तर पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 59 जणांनी 86 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. ज़िल्हा परिषदेसाठी सात व पंचायत समितीसाठी एक अशा आठ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
    

येथील पंचायत समितीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली 16 जानेवारीपासून अर्ज विक्री व भरण्यास सुरुवात झाली. सोमवार अखेर जिल्हास्तरावरून प्राप्त 600 अर्जापैकी 510 अर्जाची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वाकला गटासाठी सुनिता राजेंद्र निकम यांनी 17 जानेवारीला अर्ज दाखल केला होता. सोमवारी वाकला गटासाठी मंदाकिनी गोरख आहेर (पाराळा), सुवर्णा बाळासाहेब भोसले (पोखरी), निताबाई दत्तू त्रिभुवन (वाकला) व अश्विनी संतोष निकम (चिकटगाव) यां चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बोरसर गटासाठी अशोक दत्तात्रय म्हस्के (सोनवाडी), वांजरगाव गटासाठी छायाबाई बाबासाहेब थेटे (सावखेडगंगा) यांनी अर्ज दाखल केले. पोखरी पंचायत समिती गणासाठी टुनकी येथील कांताबाई चांगदेव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 21 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने अर्ज भरण्यासाठी पुढील दोन दिवसात इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments