या योजनेद्वारे दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत ( रुपये 2 हजार चे तीन हप्ते) थेट बँक खात्यात जमा केली जाते, जी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेला जोडलेली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये तीन समान हप्त्यात दिले जातात. योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 21 हप्ते मिळाले आहेत.
महिन्यापूर्वीच 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असून प्रत्येकी 2 हजार रुपये जमा झाले आहेत. आता महाराष्ट्र राज्य शासनानेही या योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी 1 हजार 774 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
0 Comments