वैजापूर ता.10 - नगर परिषद वैजापूर व महिला बाल कल्याण विभाग राष्ट्रीय आजीविका अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनाचे अच्युत्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
नगरपालिकेच्या प्रांगणात मंगळवारी (ता .10) सकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, उपाध्यक्ष शेख रियाज व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील महिलाचा सत्कार करून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यामध्ये शेक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील तसेच शासकीय सेवेतील महिला, पोलीस, वकील, डॉक्टर, गृहउद्योग, कचरावेचक महिला, सफाई कामगार, उद्योजक तसेच महिला बचत गटाच्या विविध उपक्रमाच्या अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला अशा एकूण 60 महिलांचे स्वागत करून त्यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी 'एक पेड मां के नाम' अंतर्गत अमृत 2.0 च्या उपक्रमा अंतर्गत 4400 झाडे लाऊन त्यांचे संगोपन करणाऱ्या महिलांचेही गुणगौरव करून सन्मान चिन्ह देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता राजुसिंग राजपूत, बक्ष शेख सुमेय्या, मोनाली खैरे, पूजा त्रिभुवन, जयश्री चौधरी, दीपा राजपूत, लता वाणी, सुरेखा घाटे, ज्योती जोशी, सुवर्णा ठोबरे, जयश्री राजपूत, कविता शिंदे, मनिष गणवीर यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन सहायक.प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत व समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन यांनी केले. यावेळी सौनचीरेया उपजीविका केंद्राच्या सर्व प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. मोठ्यासंख्येने महिलां बचत गटांनी केलेल्या वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात मौलाना आझाद विद्यालय व सेंट मोनिका इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सुमधुर संगीत नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सुत्रसंचलन श्री नागेश बापट सर यांनी केले. या कार्यक्रमास वैजापूर शहरातील सर्वच क्षेत्रातील महिलांची मोठी उपस्थिती होती.
0 Comments