वैजापूर, ता .09 - जागतिक महिला दिनानिमित्त शहरात रविवारी (ता.08) विविध कार्यक्रम घेण्यात आले. जाएन्ट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेली व यंग सहेलीच्या वतीने महिला व मुलींसाठी तीन कि.मी मॅरेथॉन स्पर्धा जाएन्ट्स ग्रुपच्या प्रमुख अंजली जोशी व अध्यक्षा मीना दाभाडे, संतोषी भालेराव व अनघा आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेला धोंडीरामसिंह राजपूत यांनी झेंडा दाखवला, सेंट मोनिका स्कुल ते एमआयटी, कॉलेज, रोटेगाव या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली
या स्पर्धेत तीन गटात समृद्धी मंत्री, सिद्धी हिरण तसेच जयश्री पवार, सुनीता राजपूत, नैना अग्रवाल, मंगला वाघमारे व संगीता राजपूत हे विजेते ठरले. विजयी स्पर्धकांना स्मृती चिन्ह, शाल व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेचे परीक्षक म्हणून धोंडीरामसिंह राजपूत यानी काम पाहिले. सेंट मोनिका विद्यालयात जेष्ठ महिलांचा अंजली जोशी व मिना दाभाडे यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. गीताई हॉस्पिटलमध्ये सुनीता रामनाथ बोर्डे यांनी नुकत्याच जन्म दिलेल्या कन्येला बाळशाचे कपडे व आईला साडी चोळी देऊन जाएन्ट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेलीच्या विद्या वाळेकर यांच्या सौजन्याने कार्यक्रम घेण्यात आला.
स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सुरेखा तांबे व मंदा तांबे यांचा विशेष गौरव करण्यात आला. या प्रसंगी फेडरेशनच्या अंजली जोशी, संतोषी भालेराव, अनघा आंबेकर, अध्यक्षा मीना दाभाडे, अलका साखरे, योगिता साखरे, वैशाली साखरे, अरुणा साखरे, विद्या वाळेकर, करिश्मा दाभाडे, योगीता दाभाडे, क्रीडा शिक्षक वकार पठाण, रमेश अग्रवाल उपस्थित होते.
0 Comments