news today, वैजापूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीरची सुरुवात खंडाळ्यातून ...

वैजापूर, ता.09 - तालुक्यात छञपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर टप्पा -1ची सुरुवात शनिवारी (ता.07) खंडाळा गावातून करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा खंडाळा येथे आयोजित या महाराजस्व शिबिरास आ.रमेश पाटील बोरनारे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत उपस्थित होते. 

छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उदघाटन करताना आ.रमेश पाटील बोरनारे व इतर मान्यवर..

शासकीय कामासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, नागरीक व लाभधारकांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, यापुढे असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. असे उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी 

शिबिरात आ.रमेश पाटील बोरनारे यांच्याहस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले....

यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. तहसीलदार सुनील सावंत यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराअंतर्गत एका छताखाली महसूल मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिबिरामध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार विषयक कामकाज, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८ अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीच्या दाखल्यांचे वितरण, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र,अकृषक परवानगी व नवीन तरतुदीबद्दल मार्गदर्शन, नवीन अकृषक तरतुदीनुसार सनद प्रक्रिया बाबत मार्गदर्शन, संजय गांधी योजना विभागामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या प्रकरणांचा निपटारा,पाणंद रस्त्यांच्या बद्दल कार्यवाही, ई-मोजणी अर्ज, ॲग्री स्टॅक आणि पीएम किसान नोंदणी, पशुवैद्यकीय अधिकारी ,भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करणे, पुरवठा विभाग विषयक कामकाज,घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटप व महसूल विभागाच्या वतीने दिला जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली घेता येणार आहे

खंडाळा येथे महाराजस्व शिबिरात मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, व्यासपीठावर आ.बोरनारे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, तहसीलदार सुनील सावंत आदी...

महसूल विभागातील तलाठी हे वैजापूर येथे कार्यालय थाटून बसल्याने शेती विषयक कामासाठी शेतकऱ्यांना वैजापूरला चकरा माराव्या लागत आहे, त्यांनी किमान चार दिवस तरी सजाच्या ठिकाणी राहावे अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी यावेळी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना केली. तर ग्रामसेवकही बाहेरगावी राहत असल्याने त्यांनी ही किमान चार दिवस गावात राहिल्याने नागरिकांचे कामे सोपे होतील असे सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एकाच दिवशी वैजापूर तालुक्यातील खंडाळा महसुल मंडळातील १ हजार ६४६ प्रमाणपत्राची वाटप करण्यात आले तसेच १५ पेक्षा अधिक विभागाचे अधिकारी शिबिराला उपस्थित होते. 

या प्रसंगी पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, नायब तहसीलदार सुरज कुमावत, मंडळ अधिकारी संजय काळे, आरोग्य अधिकारी नायला हशमी, महसूल अधिकारी सुखदेव राठोड, ग्रामपंचायत अधिकारी भीमराज दाणे, सचिन गायकवाड विविध क्षेत्रातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments