वैजापूर, ता .02 - आ.रमेश पाटील बोरणारे याच्या उपस्थितीत "मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते" योजनेविषयी पूर्व नियोजन आढावा बैठक सोमवारी (ता.02) येथे संपन्न झाली.
वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीत शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या या योजनेअंतर्गत शेतापर्यंत सुलभ व सुरक्षित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीमाल वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते निर्माण करणे तसेच पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी कमी करणे या अनुषंगाने विस्तृत चर्चा करण्यात आली.
तसेच मातोश्री पानंद रस्त्यांचे जुने प्रलंबित प्रस्ताव, मंजूर कामांची सध्याची स्थिती, तांत्रिक मान्यता, निधी उपलब्धता, तसेच कामांची गुणवत्ता यांचा सखोल आढावा घेण्यात आला. शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन बाजारपेठेशी थेट संपर्क सुलभ होईल आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
वैजापूर तालुक्यातील प्रत्येक पात्र गाव व वस्तीपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना आ . बोरणारेनारे देत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. या बैठकीत ऑनलाइन व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी देखील संबंधित विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी.अरुण जऱ्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी.भागवत फुंदे, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी वाकचौरे, मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी सभापती भागीनाथ मगर, जिल्हा परिषद सदस्य रामहरी
जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, श्रीराम गायकवाड, दीपक राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, कृ.उ.बा.समिती संचालक गोरख आहेर, संभाजी जगताप, सा.बां.कार्यकारी अभियंता अजित रोडगे, जि.प. उपकार्यकारी अभियंता श्री.सातपुते, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे, वैभव रणखांबे यांच्यासह संबंधित सर्व विभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments