news today, जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, ता.23 - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे आणि उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यांनी सोमवारी (ता.23) मुंबई विधानभवनात ओबीसी विकास मंत्री अतुल सावे व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. 

ग्रामीण विकासाला गती देत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना मार्गदर्शन केले. येत्या काळात विकास कार्य अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, आमदार सतिश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण,आमदार नारायण कुचे, माजी आमदार नितीन पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, सुहास शिरसाठ, शहराध्यक्ष किशोर शितोळे  आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments