या प्रकरणात पोलिस अंमलदार शुभम रावते यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर मोगल जगताप राहणार स्वामी समर्थ नगर वैजापूर यांनी डायल 112 वर पोलिसांना रविवार तारीख 22 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बोरसर कारखाना येथे दारू व पेट्रोलची विक्री होत आहे अशी खोटी माहिती दिली. आपत्कालीन डायल 112 वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी किशोर मोगल जगताप याच्या विरोधात वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार पडळकर हे करत आहे.
0 Comments