news today, वैजापुरात रमजान ईद उत्साहात साजरी ; जगात सुख - शांती व बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना

वैजापूर ता.21 -  जगात सुख - शांती व बंधुभाव जागावा 
अशी प्रार्थना अल्लाहकडे (ईश्वराकडे) करीत येथील ईदगाह मैदानावर ईद ची नमाज अदा करीत वैजापूरात "ईद-उल-फित्र हा सण शनिवारी (ता.21) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. हिंदू - मुस्लीम बांधवांनी एक दुसऱ्यांना शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले. 

रमजान ईद च्या शुभेच्छा देताना आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके,सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत आदी ..

शहरातील ईदगाह मैदानावर जामा मशिदचे इमाम आलम रशिदी यांनी नमाज पठण केले. सदर काझी हाफीजोद्दीन यांनी मैदानावर जमलेल्या तमाम हिंदू -मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ईदगाह मैदानावर आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, हाजी अकीलसेठ, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, तहसीलदार सुनील सावंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहराध्यक्ष पारस घाटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल संत, ॲड. प्रमोद जगताप, प्रशात पाटील सदाफळ, डॉ. राजीव डोंगरे, संजय बोरनारे, सामाजिक धोंडीरामसिंह राजपूत, नगरसेवक विशाल संचेती, राजेश गायकवाड, बाबासाहेब पुतळे, स्वप्नील जेजुरकर, सचिन वाणी, देविदास वाणी, सावनसिंह राजपूत, शैलेश चव्हाण, श्रावण चौधरी, दिनेश राजपूत, उपनगराध्यक्ष रियाज शेख, नगरसेवक सुलतान खान, आमीरअली, हमीद कुरेशी, मजीद कुरेशी, सय्यद हिकमत, कय्युम सौदागर, ॲड.
रियासतअली, काझी हाफीजुद्दीन, मलिक काझी, अल्ताफ बाबा, सलीम वैजापूरी यांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

इदगाहमध्ये नमाज झाल्यानंतर मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देताना नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती व इतर

तालुक्यातील ग्रामीण भागातही रमजान ईद शांततेत झाली. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


Post a Comment

0 Comments