news today, छञपती संभाजीनगर व फुलंब्री तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक संपन्न



छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री. अविनाश पाटील गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री तालुक्यातील महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

यावेळी आमदार सौ.अनुराधाताई चव्हाण , जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जैस्वाल, महिला व बालकल्याण सभापती सौ. मीनाक्षी ताई पवार, समाज कल्याण सभापती श्री. बालाजी सोनटक्के अर्थ व बांधकाम सभापती श्री.सचिन पाटील गरड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सन्मानीय जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सभापती श्री कल्याण गायकवाड ,  व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकरी कार्यालय येथे संपन्न झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे
प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे.जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी या उद्दिष्टांसाठी ठोस निर्णय घेण्यात आले. पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडत प्रशासनाशी थेट संवाद साधला. प्रलंबित कामांवर जबाबदारी निश्चित करून जलद निर्णय घेण्यावर भर देण्यात आला.

यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments