news today, भारतीय गो -मातेला "राष्ट्रमाता --राष्ट्र आराध्या" हा संविधानिक दर्जा मिळावा म्हणून वैजापूरकर एकवटले

वैजापूर ता.27 - भारतीय "गोमातेला राष्ट्रमाता--राष्ट्र आराध्या"हा घटनात्मक दर्जा प्राप्त व्हावा, भारतीय  गोमातेच्या रक्षणार्थ केंद्रीय गोसेवा  मंत्रालय स्थापन व्हावे आणि देशभर गोमाता रक्षणसाठी केंद्रीय कायदा  निर्माण करावा यासाठी संपूर्ण देशभर  सोमवारी (ता.27)" गो-सन्मान आवाहन अभियान राबविण्यात आले.याचाच भाग म्हणून वैजापूर शहर व तालुक्यातील गोशाळा चालक, गो -सेवेकरी व समाज कार्यकर्ते यांनी वैजापूर तहसील कार्यालयात जमा होऊन तहसीलदार यांना निवेदन दिले.

तहसीलदार यांना निवेदन देताना गोसेवक व सामाजिक कार्यकर्ते...

वेरूळ संस्थाचे श्री.स्वामी नागेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. "गो- माता-देश की माता", "गो माता राष्ट्रमाता," "गाईचे रक्षण संस्कृतीचे रक्षण"."गाय हमारी माता है-रक्षण उनका करना है" अशा घोषणाही गोसेवकांनी यावेळी दिल्या. नायब तहसीलदार सूरज कुमावत, पेशकार पारस पेटारे, वरिष्ठ लिपिक दीपक त्रिभुवन 
यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले. 
याप्रसंगी श्री .गुरू गणेश मिश्री गोपालन (घायगाव), श्री रेणुका माता गोशळा(हडस पिंपळगाव), श्री कृष्णा गोशाळा (कोल्ही), गणेशपुरी आश्रम (सवंदगाव), जय बाबाजी भक्त परिवार, सवंदगाव व भिवंगाव येथील तालुका सेवक व भागसेवक तसेच वैजापूर बजरंग दल कार्यकर्ते व समाजसेवक  मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments