news today, पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित

1 मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याहस्ते पदक स्वीकारताना पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले 

वैजापूर, ता.01 - येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले असून 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याहस्ते त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले.

पोलिस निरीक्षक ताईतवाले यांनी आपल्या सेवाकाळात विविध महत्त्वाच्या ठिकाणी कार्य करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी गडचिरोली परिक्षेत्रात काम केले असून कठीण व संवेदनशील परिस्थितीतही धाडसी कामगिरी केली आहे. याशिवाय त्यांनी मुंबई क्राईम ब्रँचला काम करतांना विशेष कामगिरी केली आहे. दरम्यान गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.

उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल आमदार रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, नगरसेवक विशाल संचेती, नगरसेवक सुलतान खान यांनी पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments