news today, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे उद्या जांबरगांव टोलनाक्यावर आंदोलन

वैजापूर, ता.17 - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोमवारी (ता.18) सकाळी नऊ वाजता समृध्दी महामार्गावरील जांबरगांव टोल नाका (इंटरचेंज क्र.19) येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 

शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने कमी भाव मिळत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नाफेड मार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करणे, कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करणे, प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देणे,कांद्याची निर्यात खुली करणे, कांदा चाळ उभारणीसाठी 75 टक्के अनुदान देणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी होणाऱ्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगांवकर, तालुकाप्रमुख मनाजी पाटील मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, मनोज गायके, ॲड.रमेश सावंत, युवासेना जिल्हा उपप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे, दिनेश मुथा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments