news today, टेंभापुरी धरणात बुडून तिघांचा मृत्यू. ; सहा जण बचावले

छञपती संभाजीनगर, ता. 03 वाळूज परिसरातील टेंभापुरी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मजुरांचा मृत्यू झाला.तर सहा जण बचावले. शुक्रवारी (ता.01) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृत आणि बचावलेले सर्वजण हे वाळूज एमआयडीसीतील विविध कंपन्यात कार्यरत होते. 
1 मे रोजी कामगार दिनाची सुटी असल्याने नऊ मजूर धरण परिसरात फिरायला गेले होते. त्यातील काही जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीन जण खोल पाण्यात बुडू लागले. मदत पोहोचण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण बचावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उतरून शोध मोहीम राबवली आणि तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
शैलेश जोगदंड (रा.परभणी) शैलेश हेलासकर, आविष्कार लोखंडे दोघेही (रा. नांदेड) अशी मृत मजुरांची नावे आहेत. तिघेही 25 ते 30 वयोगटातील असून वाळूज औद्योगिक वसाहतीमधील रांजणगाव शेणपुंजी येथील कंपनीत ते काम करीत होते.


Post a Comment

0 Comments