news today, बारावी बोर्ड परीक्षा ; वैजापूरचा निकाल 95.53 टक्के



यावेळीही मुलीच सरस ...
वैजापूर, ता.04 - फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत वैजापूर तालुक्यातील 95.53 टक्के विद्यार्थां उत्तीर्ण झाले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शनिवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहीर केला. यावेळीही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या निकालावरून दिसते. तालुक्यातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.25 टक्के आहे तर मुलांचे प्रमाण 94.36 टक्के एवढे आहे. तालुक्यातील 35 परीक्षा केंद्रावर तीन हजार 89 मुले व दोन हजार 110 मुली अशा पाच हजार 199 विद्यार्थां या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी दोन हजार 915 मुले व दोन हजार 52 मुली असे चार हजार 967 विद्यार्थां यशस्वी ठरले आहेत.


वैजापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयांचे निकाल असे
विनायकराव पाटील महाविद्यालय (95.10),
हल्क ए दवानायक कनिष्ठ महाविद्यालय (96.73)
विनायक कनिष्ठ महाविद्यालय, देव डोंगरी (69.23)
संत बहिणाबाई कनिष्ठ महाविद्यालय, शिऊर (93.25)
न्यू हायर सेकंडरी स्कूल, दहेगाव (80.95)
विनायकराव पाटील माध्यमिक विद्यालय, लोणी खुर्द (75.00)
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, गारज (98.92)
दिवंगत दादासाहेब पाटील विद्यालय, वीरगाव (95.91)
भगीरथी माध्यमिक विद्यालय, नालेगाव (98.73)
न्यू हायर सेकंडरी स्कूल, लाडगाव (84.84)
संत जोसेफ विद्यालय, माळी घोगरगाव (80.00)
एस आर कनिष्ठ महाविद्यालय, वाकला (80.00)
जिजाई कनिष्ठ महाविद्यालय, मनूर (95.55)
श्री पारेश्वर माध्यमिक विद्यालय, पालखेड (78.37)
राजे संभाजी माध्यमिक विद्यालय, आघुर (98.24)
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, भटाणा (96.98)
श्रीराम माध्यमिक विद्यालय, लाखणी (75.86)
छ. शाहू माध्यमिक विद्यालय (93.33)
मनुबाई माध्यमिक विद्यालय, मनेगाव (95.83)
कुलभूषण कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा (98.66)
श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, लाख खंडाळा (99.07)
न्यू हायर सेकंडरी स्कूल, धोंदलगाव (86.36)
रामेश्वर माध्यमिक विद्यालय, बिलवणी (92.30)
न्यू हायस्कूल, महालगाव (91.66)
कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय, नीमगाव (98.70)
राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय (84.61)
दिवंगत दादासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय (98.43)
छ. शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (96.69)
गॅलेंक्सी ग्लोबल इंग्लिश स्कूल (98.13)
श्री द्वाराकनाथ इंग्लिश स्कूल (100)
संत शिवाई पब्लिक स्कूल (93.61)
रोम्बस जुनिअर कॉलेज (90.90)

या महाविद्यालयांचे निकाल 100 टक्के ...

संजीवनी कनिष्ठ महाविद्यालय, वैजापूर
श्री द्वारकानाथ इंग्लिश स्कूल
वंडर किडस इंग्लिश स्कूल
सुतवणे इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज

Post a Comment

0 Comments