vaijapur, news, आ. बोरणारे यांचा पाठपुरावा नागमठाण पुलास जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर, कामाचा शुभारंभ



वैजापूर, ता.29/ प्रतिनिधी - गोदावरी नदीवरील राज्य मार्ग क्रमांक 216 वरील  नागमठाण पुलास जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी आ. रमेश पाटील बोरणारे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्यासाठी जमिनी हस्तांतरणाचा प्रश्नही मार्गी लागल्याने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.27) करण्यात आला.
तालुक्यातील शनि देवगाव येथे सदगुरू गांगागिरी महाराज यांचा 178 वा सप्ताह होत आहे.  गोदावरी नदीवरील राज्य मार्ग क्रमांक 216 वरील नागमठाणचा रस्ता होणे गरजेचे होते. या रस्त्यासाठी जमीन संपादनाचा महत्वाचा प्रश्न होता. महंत रामगिरी महाराज यांनी शासनाकडून योग्य मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने जमिनीचा मोबदला न मिळताही शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास जमीन अधिग्रहण करून दिली. पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे यांनीही यासाठी पाठपुरावा केला.
रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण व लागणाऱ्या निधीचा प्रश्न मार्गी लागल्याने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला.
यावेळी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमास पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments